महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज दिसून येतोय; राऊतांच्या विधानावरून चंद्रकांतदादांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपमधील नेत्यांममधून एकमेकांवर सध्या चांगलेच टीकेचे बाण सोडले जात आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी आज वीज बिलासंदर्भात एक विधान केले. त्यांच्या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “राऊतांच्या आजच्या विधानातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज दिसून येतो, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “वीज फुकटात तयार होत नाही, त्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे वीजबिल माफ होणार नाही !” असे विधान ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी केले असून हे विधान म्हणजे उलट्या काळजाच्या सरकारमधील असंवेदन शीलतेचा प्रत्यक्ष पुरावा आहे. नितीनजींना मी एकच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचे पीकदेखील फुकट उगवत नाही. शेतकऱ्यांचे कष्ट आणि घाम पेरल्यानंतर उगवणाऱ्या अन्नातूनच सर्वांचे पोट भरते.”

“अन्नदात्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारने कर्जमाफी दिली नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, त्यांच्यावर अन्याय्य दरवाढ लादली आणि वीज कनेक्शन तोडून आपल्या निर्लज्जपणाचा जिवंत पुरावा दिला आहे. या सगळ्यानंतर आता ही अत्यंत उर्मट भाषा वापरून आपण आज महाराष्ट्रातील तमाम अन्नदात्यांचा अपमान केला आहे. ही भाषा आपल्याला चढलेला सत्तेचा माज दाखवते, अशा माजोरड्या सरकारचा धिक्कार असो !”

शेतात पीक फुकट उगवत नाही. शेतकऱ्यांच्या कलेला देखील मोल आहे ! सरकार कुणाचेही असो, राज्यातील शेतकरी सरकारकडे आधार म्हणून बघत असतो. “भाजपाने शेतकऱ्यांना वीजबिलमाफीची सवय लावली” असे राऊत म्हणालेत. याचा अर्थ आम्ही सरकारमध्ये असताना आमचे शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचे कर्तव्य चोखपणे बजावले आणि या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय आतातरी थांबवा नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी अन्यायाविरुद्ध संघर्ष करतील आणि या माजोरड्या सरकारला आपली जागा दाखवून देतील !”,असे पाटील यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment