धोनीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी; सुब्रमण्यम स्वामींचा धोनीला सल्ला

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीने कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली.परंतु आपण इंडियन प्रीमियर लीग मात्र खेळणार आहोत असही धोनीने नमूद केलं.यातच आता धोनीला चक्क एक वेगळीच ऑफर आल्याच पाहायला मिळत आहे. भाजपचे राज्यसभेचर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे.

धोनीनं आतापर्यंत कधीच कोणत्याही पक्षाला जाहीररित्या पाठिंबा दिला नव्हता.परंतु झारखंडमधील त्याची लोकप्रियता पाहता त्याची राजकीय कारकिर्दही चांगली चालू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यानं जे कौशल्य आणि संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये दाखवली त्याची सार्वजनिक आयुष्यातही गरज आहे. त्याला २०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी,” असं स्वामी म्हणाले.

याअगोदर भाजपानं दोन- तीन वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीशी संपर्क साधला होता. ‘संपर्क से समर्थन’ या अभियानाअंतर्गत तत्कालिन भाजपा अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांनी धोनीची भेट घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here