मंत्रिमंडळाची सुरुवात U नेआणि शेवट A ने ; उलट्या बाराखडी प्रमाणे कामही उलटसुलट – मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने भाजप कडून ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. “या सरकारच्या मंत्रिमंडळाची सुरुवात U अक्षराने आणि शेवट A ने आहे. यांची बाराखडी जशी उलटी आहे, तसेच यांचे वर्षभरातील कामंही उलटसुलट आहेत,” असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला

महाविकास आघाडी सरकारकडून चांदा ते बांदाच्या लोकांना न्याय प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. सरकारने हा अपेक्षाभंग केला आहे, मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो. तेव्हा पहिलं नाव U पासून सुरु होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरे म्हणजे A वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामंही उल्टं झालंय. उलट्या बाराखडी सारखं एक वर्ष उलटंसुलटं काम करणारं सरकार आपण अनुभवतोय, अशी टीकाही त्यांनी केली

केंद्राने जीएसटी दिला नाही, केंद्राने मदत केली नाही, वीजबिल माफ करायला केंद्राने पैसे द्यावेत, अशी अपेक्षा करतात. यांनी फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या, नवी दालनं करायची. याचं काम काय आहे? संविधानाच्या राज्यसूचीतील 66 विषयांचे प्रश्न सोडवण्याची आणि न्याय देण्याची जबाबदारी केंद्राची आहे का? दुर्दैवाने महाराष्ट्रात लढणारं नाही, तर रडणारं सरकार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like