राज ठाकरेंची भूमिका ही राजकारणाच्या पलीकडची ; भाजपकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाणार प्रकल्पासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प गमावू नका अस आवाहन केलं होतं. दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे भाजप खुश झाले असून भाजप कडून राज यांचे कौतुक केले जात आहे. राज ठाकरेंची भूमिका ही राजकारणाच्या पलीकडची आहे, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भूमिकेच स्वागत केले आहे.

नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. राज यांची भूमिका राजकारणाच्या पलीकडची असून महाराष्ट्राला शक्तीशाली करण्याकरता आहे. असे प्रकल्प राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. आता उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाकरता परवानगी द्यावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, कोकणात रोजगार आणि विकासाचा प्रकल्प व्हावा असं लोकांना वाटत आहे. भाजपची देखील आधी पासूनच ही भूमिका आहे असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हंटल. या प्रकल्पाबाबतचे लोकांचे गैरसमज दूर झाले आहेत. स्थानिकांनी राज यांना त्यांची भूमिका सांगितली असेल. त्यामुळे राज यांनीही नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असेल. राज यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो, असं नितेश यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment