भाजप समर्थकांकडूनच पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका?; ‘या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथील सभेसाठी निघाले असताना शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदींचा ताफा भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेसकडून परस्परांवर टीका केली जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक व्हिडिओ शेअर करीत या घटनेची पोलखोल केली आहे. तसेच भाजप समर्थकांनीच पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला? असा सवाल उपस्थित केला आहे.

नवाब मलिक यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यातून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मलिक यांनी म्हंटले आहे की, भाजप समर्थकांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग कसा केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका होता आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर 15-20 मिनिटे अडकून पडले होते. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. या घडलेल्या प्रकारावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावेळी घडलेल्या घटनेवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment