स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला पक्ष तिकीट देणार नाही असा गौप्यस्फोट केला आहे. पक्षाने आपल्याला विचारले होते की तुम्हाला सोडून कोणाला तिकीट द्यायचे तुम्ही सांगाल त्याला आम्ही तिकीट देऊ असे खडसे म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एकनाथ खडसे यांना पक्षाने डावलल्याने त्यांचे कार्यकर्त्ये अत्यंत संतप्त झाले आहेत.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या देखील बातम्या आहेत. त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की , शरद पवार यांनी केलेल्या विधानस काहीच अर्थ नाही मी कधीच राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो आणि नाही. पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयावर मी पूर्ण विश्वास ठेवायचे ठरवले आहे.

दरम्यान एकनाथ खडसे मागील तीन महिन्यापासून आपल्या संपर्कात आहेत असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच वादळ निर्माण झाले आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप खडसेंना उमेदवारी देणार का ? की खडसे भाजपमधून राष्ट्रवादीत जाणार की अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार की निवडणुकीतून माघार घेणार या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच मिळणार आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Comment