संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत- उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.

संभाजीराजेंनी जी भूमिका घेतलीये, त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही. आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे. किळस आली आहे. सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. अधिवेशन बोलवा, लाईव्ह टेलिकास्ट करा. सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही नेतृत्व करणार ना?, असं उदयनराजे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment