विदेशी गांधींना सोडून देशी गांधीवाद्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं, उमा भारतींची सोनिया गांधींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस पक्षातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील गांधी-नेहरु घराण्याचं वर्चस्व संपलं आहे. लखनऊमध्ये ज्या प्रकारे स्वतःला नवाबाचे वंशज समजणारे लोक आता टांगे चालवताना दिसतात, त्याप्रमाणे गांधी घराण्याचं फक्त नाव शिल्लक राहिलं असून आता कुणाला, काय पद मिळतंय याला जास्त महत्त्व नसल्याचं भाजप नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसला आता खऱ्या गांधीवाद्यांकडे वळण्याची गरज आहे. खरे गांधीवादी ते आहेत ज्यांचा विदेशी लोकांशी, विचारांशी अजिबात संबंध नाही. अशी कुणी व्यक्ती सध्याच्या घडीला शिल्लक असेल तर त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं असा विचार भारती यांनी बोलून दाखवला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे उमा भारती यांनी त्यांच्यावर टीका केली असुन याला काँग्रेसजण काय उत्तर देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’