हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते (tauktae cyclone) चक्रीवादळ महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातून गुजरातकडे सरकत आहे. या वादळाने तीव्र वेग धरला असून, मुंबईसह अनेक भागांना याचा फटका बसला आहे. आज सकाळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. जळगावचे भाजपा खासदार उमेश पाटील यांनी यावरून एक ट्विट शेअर करत तौक्ते वादळावरुन शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव असून संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. सध्या या ट्विट ची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव
संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार. 😂@BJP4India @BJP4Maharashtra
— Unmesh Patil (@UnmeshPatilBjp) May 16, 2021
दरम्यान, अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतही अतिमुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासाठी सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर येथेही सोमवार आणि मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.