Monday, January 30, 2023

संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा आणखी उतरली नाही का? ; चित्रा वाघ यांचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा आणखी उतरली नाही का? औरंगाबादच्या बलात्काराच्या घटनेवर संजय राऊत यांनी एक शब्दही का काढला नाही?असा सवाल वाघ यांनी केला.

पैठण तालुक्यातील दोन महिलांवर सामूहिक अत्याचाराच्या घटनेवरून चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाघ यांनी माध्यमांशी सवडसादला. यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेना खासदार संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांनी या अत्याचाराच्या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही.

- Advertisement -

यावेळी वाघ यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर टीका केलेली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, १५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय…कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल.

यावेळी वाघ यांनी कायदा व सुव्यवस्था याचा मुद्दाही उपस्थित केला. राज्यात एकही जिल्हा असा नाही जिथे महिलांचे शोषण होत नाही. नवीन कायदा कधी येणार माहिती नाही, असे वाघ यांनी म्हंटले आहे.