आता राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ? चित्रा वाघ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने लेखी सांगितले. त्यानंतर केंद्र सरकार भ्रमिष्ट असल्यासारखे वागत आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या टीकेला भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. “महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं मग राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का??” असा सवाल वाघ यांनी विचारला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप व केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर त्यांना भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातुन प्रत्युत्तर देत आठवण करून दिली आहे की, राज्य सरकारकडूनच ऑक्सीजन अभावी मृत्यू न पावल्याची माहिती दिली गेली आहे.

वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटली की, ऑक्सीजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलयं मग राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ??

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून केंद्र सरकारकडून ऑक्सीजन अभावी मृत्यू झाल्याची नोंदच नसल्याची लेखी माहिती दिली गेली असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात आली होती. राऊत यांच्या आरोपानंतर भाजपमधील नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, भाजप नेत्यांनी माहिती घेत राऊत यांच्याकडून खोत बोललं जात असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. वाघ यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like