बेळगाव महानगरपालिकेत भाजपचा बोलबाला; मिळाले स्पष्ट बहुमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. भाजपने 29 जागांचा आकडा पार केला असून पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. आत्तापर्यंत बेळगावात भाजपला 30, काँगेस 7, मए समिती 2, एमआयएमला 1 जागा मिळाली आहे. कॉंग्रेसमध्ये मात्र निराशा पहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी बेळगावात आमचाच झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Comment