तेव्हा राणेंना अटक केली, आता नाना पटोलेंना मुख्यमंत्री अटक करणार का? भाजपचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त  विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच नारायण राणे यांना अटक करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नाना पटोलेना अटक करणार का असा सवाल त्यांनी केला आहे. विक्रांत पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ ची बातचित करताना नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली.

वाचाळवीर नाना पाटोळे यांनी सगळी हद्द पार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची हिम्मत दाखवली. मुळात ज्या पंतप्रधानांच्या कर्तृत्वाचे जगभरात कौतुक केल जात आणि दुसरीकडे नाना पटोले यांच्या कर्तृत्वाची उंची किती तोकडी आहे हे महाराष्ट्राला माहित आहे असा टोला विक्रांत पाटील यांनी लगावला तसेच याप्रकरणी राज्यभरातील पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल करून नाना पाटोळे यांच्या अटकेची मागणी आम्ही करत आहोत असे विक्रांत पाटील यांनी म्हंटल

नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांना कोणतेही चुकीचं विधान केलेलं नसताना त्यांच्या अटकेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे आता देखील मुख्यमंत्री तशाच प्रकारे पोलिसांवर दबाव आणून नाना पटोले याना अटक करणार का असा थेट सवाल विक्रांत पाटील यांनी केला आहे

दरम्यान, मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदींबद्दल बोललो अशी सारवासारव नाना करत असले तरी आपण तो विडिओ नीट पहिला तर तुम्हाला समजेल की नाना पटोले हे पंतप्रधान मोदीं बद्दल च बोलत होते असेही विक्रांत पाटील यांनी सांगितलं. तसेच देशभरात आम्ही नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार आहोत असेही त्यांनी सांगितल

Leave a Comment