भाजपचे नगरसेवक विनायक पावसकर यांचा जनशक्ती व राजेंद्रसिंह यादव यांच्यावर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड नगरपालिकेत सध्या राजकीय धुळवड जोरदार सुरू झाली आहे. बजेटच्या सभेनंतर सत्ताधारी जनशक्ती आघाडी व नगराध्यांक्षा, भाजपचे नगरसेवक यांच्यात पत्रकार परिषद घेवून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्यावर आरोप करण्यात आले. कराड नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यांक्षा रोहीणी शिंदे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, सुहास जगताप, फारूक पटवेकर आदी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचे नांव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच जनशक्तीच्या कारभारवही खालील मुद्यावर आपले मत मांडले.

कुठलाही व्यवसाय नसताना लाखो, करोंडोची इस्टेट कशी ?

सगळ्या गावाला माहिती आहे, टक्केवारीवर कोण जगणार आहे. आमच्या कारर्दीत कधी टक्केवारीचा विचार करत नाही, त्यामुळे टेंडर कोण ते माहीती नाही. टेंडरचा विचार करणारे हेच लोक आहेत. गेली कित्येक वर्ष हेच काम ही लोक करत असून यांनी काय कष्ट केले आहेत. कुठे काय यांचा व्यवसाय नाही, तरी लाखो, करोंडो रूपयांची इस्टेट येते कशी असा सवाल केला.

आमदारकीचं स्वप्न पूर्ण होणार नाही

अतृप्त आत्मा माझ्यावर टीका केली. मात्र आमदारकीची स्वप्न पूर्ण होवू शकणार नाही. यांची कल्पना आलेली असल्याने ते अतृप्त केवळ नगरपालिकेला नाही तर गावाला त्रास देण्याचे काम करत आहेत. माझा अतृप्त आत्मा असा उल्लेख केला, मी तृप्त आहे. मी ३५ वर्ष नगरसेवक तर २२ वर्ष स्थायी समितीत काम केले आहे. त्यामुळे तृप्त आहे, अतृप्त नाही.

 

नैतिकता तुमच्याकडे आहे का? तुमच्या कतृत्वाने निवडणुकीत पडला.

नैतिकता हा शब्द त्यांच्या तोंडून शोभूच शकत नाही. नैतिकतने नगराध्याक्षांनी राजीनामा द्यावा असे विधान केले. तुमच्याकडे नैतिकता आहे का ते तापासून पहावे, पहिली पोटनिवडणूक आठवत असेल तर बघा त्यांनी त्यावेळी आमच्या पार्टीकडून उभा राहिलात. आम्ही स्वतः महिनाभर काम केले आणि निवडूण आल्यानंतर सत्कारही आमच्या कार्यालयात झाला. मागील नगरपालिकेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आधार घेवून चेहरा, नांव घेवून तुमचे नगरसेवक निवडूण आले, तुम्ही नाही. तुम्ही पडलात, तुमच्या कतृत्वाने पडला. तिसऱ्या दिवशी सगळ्या पार्टीला बदलायला लावल आणि स्वतः ला आतमध्ये घ्यायला लावलं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, खोट वागायचं पण रेटून वागायचं केवळ स्वार्थासाठी. गाव ताब्यात घ्यायचं बहुतेक स्वप्न आहे त्याचं, घ्या गावं ताब्यातं पण भलं करा. केवळ स्वताःच्या स्वार्थासाठी नियोजित वॉर्डासाठी नको.

अरूण जाधव एकदातरी आठवले का?

आज जनशक्तीची आठवण येते. अरूण जाधव जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष आहेत. पाच वर्षात एकदातरी आठवले का? त्यांचे अत्यंत चागलं काम आहे. त्यांच्या कमिटीच्या शारदा जाधव आहेत, त्यांचे मार्गदर्शन केव्हा, केव्हा- कुठे, कुठे घेतले ते सांगा. अरूण जाधव आमचे मित्रच आहेत. तुम्ही पलटी मारता हे स्पष्टच आहे.

निर्धार मेळावे तडजोडीसाठी

निवडणुका आल्या की त्यांना मेळावे आठवतात. मेळावे पाठिंबा देण्यासाठी असतात. परंतु त्यांचे निर्धार मेळावे हे तडजोडीसाठी कि पाठिंब्यासाठी होते. मेळाव्यात त्यांचे वाक्य असते आम्ही जिकडे त्यांचा विजय हमखास, म्हणजे आमिष दाखवून एखादा पक्षाला- उमेदवारांला तडजोडीचे अमंत्रण तर नाही ना. निर्धार केला, पाठींबा दिला. काय दिलं आणि काय मिळालं हे सगळं गाव जाणतं. त्यामुळे नैतिकता आणि खरं बोलणं हे तुमच्याकडे नाहीच.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment