विजय साजरा करण्यासाठी जेसीबीने गुलालाची उधळण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,
पुन्हा संजयकाकाच…अशी जोरदार घोषणाबाजी करत विट्यात जेसीबीने गुलालाची मुक्त उधळण करीत विटा शहरासह खानापूर तालुक्यात ठिकठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा विजयोत्सव साजरा केला.  यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकरनाना मोहिते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खासदार पाटील यांचा विजयोत्सव साजरा केला. विटा शहरात निकाल जाहीर होण्याआधीच खासदार पाटील यांच्या विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. शंकरनाना मोहिते यांच्या पुढाकाराने शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत जेसीबीने गुलालाची उधळण केली.  आज झालेल्या मतमोजणीच्या फेरीनिहाय मताधिक्य जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर साळशिंगे रोडवरील आमदार अनिल बाबर यांच्या कार्यालयासमोर, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयासमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

Leave a Comment