विधानसभेला भाजप 160 जागा लढवणार?? मुख्यमंत्रीपदाबाबत काय ठरलं??

modi fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली असून त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच कोणताही निर्णय घेण्यात येणार नसून निकालानंतरच याबाबत घोषणा करण्यात येईल असेही भाजपचं ठरल्याचं बोललं जात आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी अमित शाह भाजप नेत्यांना काय संदेश देतात? कोणती रणनीती राबवण्यास सांगतात? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. लोकसभेत भाजपला चांगलाच फटका बसला होता, अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत १६०च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, दिल्लीतून १५५ ते १६० च्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळेल असेही आशा भाजपला आहे.

मुख्यमंत्री कोण होणार?

भाजपाला खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची होती, पण आता २८८ जागा लढण्याची वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्या जागा त्याच पक्षाकडे ठेवल्या जातील, उर्वरित जागांचे वाटप कसे करायचे हाच प्रश्न महायुतीपुढे आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता सामूहिक नेतृत्त्वाखाली लढायचे, अशी भाजपची रणनीती आहे. भाजपने कधीही, कोणाचे नाव पुढे करून विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही राज्यात लढवलेल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, अशी राज्ये किंवा मित्र पक्षांसोबत सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी कधीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही अशी शक्यता आहे.