सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत भाजपाला विचारात घ्यावेच लागणार : डाॅ. अतुल भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. भाजपाला विश्वासात घेतल्याशिवाय कुणालाही आपले समीकरण करता येणार नाही. आमच्या पक्षाची सहकार क्षेत्रात ताकद वाढली आहे. जिल्ह्याची शिखर बॅंक असल्याने या संस्थेचे राजकारण करताना आमचा विचार घेतल्याशिवाय कुणालाही निर्णय घेता येणार नसल्याचे भाजपाचे नेते डाॅ. अतुल भोसले यांनी सांगितले आहे

कराड येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली वीजदरवाढ तातडीने रद्द करावी तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत, शेतकऱ्यांचा मुक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचीही तयारी सुरू आहे. त्यावर सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत भाजपाची काय भूमिका राहणार हे डाॅ. अतुल भोसले यांनी सांगितले. यावेळी कृष्णा सरकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, धनाजी पाटील, उमेश शिंदे, संचालक सयाजी यादव, मकुंद चरेगांवकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाची सातारा जिल्ह्यातील ताकद वाढली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोणालाच आपलं समीकरण करता येणार नाही, अस वक्तव्य केले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपा उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसपुढंही कडवं आव्हान उभं राहणार हे निश्चित आहे. सातारा जिल्ह्यात खासदार छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, डाॅ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आ. जयकुमार गोरे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

Leave a Comment