राज्यात भाजपचा मुख्यमंत्री कधीही होणार नाही- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. किमान पुढचे 25 -30 वर्ष तरी महाराष्ट्रात त्यांची सत्ता येणार नाही असे म्हणत त्यांनी भाजपला डिवचले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं

संजय राऊत म्हणाले, भाजपवाले म्हणतील की उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगतील पण काही झालं तरी महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. त्यांनी महाराष्ट्र विसरून जावं महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

दरम्यान इथून पुढे भाजपशी युती बाबत कोणतीही चर्चा नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना-भाजप युतीत आम्ही थोडंफार एकत्र होतो. एकत्र नांदलो. हे जे काही नातं होतं ते भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे असे त्यांनी सांगितले