शिवसेनेशी बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्यासह तीसहून अधिक आमदार असून ते गुजरातमध्ये आहेत. दरम्यान ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून भाजपने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असल्याची चर्चा केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे सुमारे २९ आमदारांसह न रिचेबल झाले आहेत. दरम्यान, सर्व आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले असून शिंदे यांची आपल्या आमदारांसह केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट होणार आहे. या भेटीपूर्वीच भाजपने शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार आदी आमदार आहेत.

Leave a Comment