संभाजीराजे तर आमचे राजे आहेत, भाजप आरक्षणासाठी पाठिंबा देणार – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून येत्या १६ जून रोजी कोल्हापुरातून मराठा मोर्चाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या घोषणेचं स्वागत करत आमचा राजेंच्या आंदोलनाला सामान्य नागरिक म्हणून संपुर्ण पाठिंबा असेल असे म्हटले आहे. भाजपचा झेंडा किंवा कार्यकर्ता अशी ओळख न दाखवून सामान्य नागरिकाप्रमाणे पाठीशी राहू असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी आम्ही उभे राहू. महाराज तर आमचे नेते आहेत. आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत, असं पाटील म्हणाले.

संभाजीराजेंना आमचं काही सहकार्य हवं असेल तर आम्ही त्यांना मदत करू. आम्ही आंदोलनात आलो तर राजकीय रंग लागू शकतो. आमच्या हातात झेंडा नसला तरी आमची आयडेंटीटी गडद आहे. त्यामुळेच आमचं सहकार्य असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. आम्हाला महाराजांचं नेतृत्व मान्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment