व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

2024 ला भाजपचे 43 खासदार अन् 170 जागा येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपचे 43 खासदार आणि विधानसभेला 170 जागा निवडणूक येणार अस भाकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते कोल्हापूर येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी रॅलीत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. मग महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढावे किंवा एकट्याने यावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लिहून ठेवा 2024 ला 42 ते 43 खासदार आणि विधानसभेला 160 ते 170 जागा घेणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही महाविकास आघाडीला सुचक इशारा दिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान दाखवावे लागते. तरीही ही निवडणूक आम्ही जिंकली. विधानपरिषदेला तर गुप्त मतदान असते. म्हणूनच मी म्हणालो होतो ‘ये तो अभी झाकी है, बिस तारीख बाकी है’.अस चंद्रकांत पाटील म्हणाले.