विधानसभेसाठी भाजप इतक्या जागा लढवण्यास इच्छुक; दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना थेट आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये ही महायुती (महायुती) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) चांगली चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच सूत्रांनी माहिती दिली आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 160 जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी 160-170 पेक्षा कमी जागा लढवू नयेत, असे दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यापेक्षा कमी जागा भाजपकडून लढवल्या जाणार नाहीत.

समोर आलेल्या माहितीनुसार, या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. याचा अंदाज बांधूनच भाजप नेत्यांनी दिल्लीच्या प्रमुख नेत्यांकडे 160 जागा लढवू असा आग्रह धरला आहे. परंतु या आग्रहामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत जर भाजपने 160 जागा लढवल्या तर शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला किती जागा येतील? हा प्रश्न निर्माण होतो.

विधानसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपने 160 जागा लढवल्या तर शिंदे गट आणि अजित पवार गटाकडे ६० किंवा ७० जागा येतात. इतक्या कमी जागांवर लढण्यासाठी हे दोन्ही गट तयार नसतील. महत्वाचे म्हणजे दुसऱ्या बाजूला शून्य कटारे 100 जागा लढवण्याची इच्छा दाखवली आहे तसेच अजित पवार गटाचे देखील अशीच इच्छा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेला खरंच 160 जागा येतील का हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर, जागा वाटपामुळे पुन्हा एकदा तिन्ही गटांमध्ये वाद निर्माण होईल का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.