गुवाहाटी पालिका निवडणुकीत भाजपाला 60 पैकी 58 जागा तर काॅंग्रेसला भोपळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आसाममधील गुवाहाटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने एकहाती सत्ता मिळवली आहे. सत्ताधारी भाजपने एकूण 60 जागांपैकी तब्बल 52 जागा व मित्रपक्षांने 6 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आली नाही. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

गुवाहाटी नगरपालिकेत भाजपाची सत्ता होती. त्यानंतर आज झालेल्या निवडणूक निकालात सुरूवातीपासूनच भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. पहिल्या दोन तासांतच महापालिकेचं चित्र स्पष्ट झालं. आसामधील यापूर्वीच्या पालिका निवडणूकीत भाजपाने सत्ता मिळवल्यानंतर आता गुवाहाटी महापालिकेवरही पुन्हा सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपला 60 पैकी 52 जागांवर तर मित्र पक्षाला 6 जागांवर विजय मिळाला. आपने पहिल्यांदाच या निवणुकीत उमेदवार उतरवले होते त्यांना एक जागा मिळाली असून आसाम जातीय परिषदेला एक जागा मिळाली आहे.

आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आज झालेल्या पालिकेच्या मतमोजणीत काॅंग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे काॅंग्रेस पक्षावर मोठी नामुष्की अोढावली आहे. भाजपाने गुवाहाटी पालिका पुन्हा एकहाती ताब्यात घेतली. याबाबतचे ट्विट करत भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment