100% साक्षरता असणार्‍या केरळ मध्ये भाजप केवळ एकाच जागी आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आज आहे. या निघालामध्ये यंदा सलग दुसऱ्यांदा पिनराई विजयन यांच्या भक्कम नेतृत्वाखाली एलडीएफला आघाडी मिळाली आहे. या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या कामाला जनतेने पसंतीची पावती दिल्याचे मतदान निकालांमध्ये दिसून येत आहे. सोबतच केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या बीजेपीचा या निवडणुकीत सपशेल धुव्वा उडाल्याचे दिसून आले आहे. केवळ १ जागेवर बीजेपी आघाडीवर असून केरळच्या जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

केरळ विधानसभामध्ये 140 जागा आहेत. यामध्ये एलडीएफ 73 जागांवर आघाडीवर असून, केरळमध्ये पुन्हा कमुनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार बनेल असे चित्र स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार डावी लोकशाही आघाडी हे 73 जगांसहित आघाडीवर असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला हे 43 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहे.

केरळची जनता जवळपास १०० टक्के साक्षर आहे. यामुळे या राज्याकडे साक्षर आणि आधुनिक राज्य म्हणून पहिले जाते. केरळची जनता दीर्घकाळापासून डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस महाआघाडीच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला आलटून-पालटून सत्ता सोपवत असल्याचे दिसून आले आहे. पण भाजपला सुरवातीपासून या राज्यामध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. या वेळी केंद्रीय नेतृत्वाने आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यामधील निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे याचा फायदा केरळ निवडणुकीत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, निकालात बीजेपी केरळमध्ये सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

You might also like