भाजपचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष यांच्या दोन चारचाकी गाडीची तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्वर तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या वैयक्तिक मालमत्तेचे गेल्या काही दिवसापासून करण्यात आले आहे. यामध्ये त्याच्या स्वः मालककीच्या दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी मधुकर बिरामणे यांनी पोलिसांकडे तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे धाव घेतली आहे.

मिळालेली माहिती अशी, पाचगणी जवळील राजपुरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ श्री. बिरामणे यांनी गाडी पार्क केली होती. चारचाकी गाडी क्रमांक (MH- 11- CW- 1489) अज्ञात व्यक्ती कडून गाडीच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. यापूर्वी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पाईप लाईन केली होती. ती अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकली आहे.

तर दि 21/3/2022 रोजी गाडी क्रमांक (MH-14- BX- 1290) या गाडीची समोरील काच ही फोडण्यात आली असल्याची तक्रार पाचगणी पोलीस स्टेशन येथे दि 22/3/2022 दाखल केलेली आहे. त्यानंतर आज रात्री दुसरी चारचाकी (MH- 11- CW-1489) या गाडीच्या सर्व काचा फोडलेल्या दिसत आहेत. तरी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी श्री. बिरामणे यांनी केली आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी सातारा जिल्हा पोलिस प्रमुख, वाई पोलिस स्टेशन पोलिस उपअधीक्षक शितल जानवे -पाटील, तसेच विरोधी पक्षनेते भाजप व भाजप जिल्हाध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Comment