भाजपचे खा. रणजिंतसिंह यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर आगवणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्याबाबत ही तक्रार दिलेली होती. मात्र, तरीही गुन्हा दाखल झालेला नव्हता, अखेर दिगंबर आगवणे यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

दिगंबर आगवणे यांच्या याचिकेवर अखेर न्यायालयाने आदेश दिला. त्यानंतर फलटण पोलीसांनी खासदार रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच बरोबर अन्य दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फलटण ग्रामीण पोलिसांनी सांगितले.