पूर्व विदर्भातील भागांचे नुकसानीचे पंचनामे करून पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या!- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर बनली असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उद्भवली आहे. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते 36 तासांनी पोहोचते. वेळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असते. पण, तसे न केल्याने नदीकिनारी राहणार्‍या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं.

फडणवीसांनी यावेळी पूरबाधित भागाविषयीची आकडेवारीही सादर केली. ज्यामध्ये भंडारा जिल्ह्यात सुमारे 5 हजार कुटुंब, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत, गोंदियात 40 गावे पूरामुळे बाधित असल्याचे त्यांनी सांगितलं. पूर परिस्थितीमुळे गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ही परिस्थिती पाहता किमान आता तरी मदतीसंदर्भात राज्य सरकारने त्वरित पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

सदर भागामध्ये एनडीआरएफची मदतही उशिरानं पोहोचल्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी आता राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून पूरग्रस्त भागातील जनतेला वेळीच मदत करावी. मदतीसंदर्भात कोल्हापूरच्या पुराच्या धर्तीवर स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment