कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यभरातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी येथील शहर भाजतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. येथील शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदीरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी येथील मारूती बुवा मठाच्या बाहेर आंदोलन केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, श्री पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, विवेक भोसले, सागर लादे, रूपेंद्र कदम, सागर लादे, विश्वनाथ फुटाणे, उल्हास बेंद्रे, मोहन पुरोहीत, विशाल कुलकर्णी, निखील शाह, नितीन शाह, शैलेश गोंदकर, सागर लाखे, सुहास चक्के यांच्यासह मारूती बुवा मटातील सर्व वारकरी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मंदीरासमोर टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला.
यावेळी भुमिका मांडताना शहराध्यक्ष बागडी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या पाच महिन्यात धार्मिक स्थळे बंद ठेवले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे त्यावर जगणाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अन्य सर्व व्यवहार सुरळीत असताना केवळ मंदीरेच बंद का आहेत, याचा जाब सरकारला विचारयाल हवा. सर्व मंदीरे खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर असे आंदोलन करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडमध्येही आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची दखल घेवून सरकारने मंदीर खुली करावीत, अशी आमची मागणी आहे