दार उघड उद्धवा दार उघड म्हणत भाजपचे शंखनाद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. सध्या शाळा महाविद्यालय आणि धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील गजानन मंदिर परिसरात भाजपने शंखनाद आंदोलन करत दार उघड उद्धवा दार उघड असे आज सकाळच्या सुमारास सरकारचा निषेध केला आहे.

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गर्दी न करण्याचे आदेश दिलेले असतानाही मंदिर खुले करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मंदिर सुरु करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी दार उघड बये दार उघड अशा जयघोषात संबळ वाजवण्यात आला. नागरिकांच्या भावनांशी न खेळता लवकरात लवकर मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा आमदार अतुल सावे म्हणाले, ‘राज्य सरकारने मद्यालय सुरू केलेली आहे. आणि धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. गणेशोत्सवापर्यंत जर मंदिरे उघडण्यात आली नाही तर सर्व भाविकांना घेऊन मंदिराचे कुलूप तोडण्यात येईल आणि मंदिरात प्रवेश करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे, महिला आघाडीच्या अमृता पालोदकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख मंदिरात गेलेले चालतात, पण सामान्य जनतेला निर्बंध – संजय केणेकर
राज्य सरकारने धार्मिक स्थळे स्वर्वसामान्य लोकांसाठी बंद करून ठेवली आहेत, परंतु शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कावड यात्रा मंदिरात अभिषेक केलेला चालतो पण सामान्य जनतेने मंदिरात गेले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. अशाप्रकारे खुद्द जिल्हाप्रमुख च आपल्या सरकारच्या आदेशाला धुडकावून लावत आहेत. अशा प्रकारचे हे तालिबानी सरकार राज्यात सत्तेत बसले आहे असे घणाघाती आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी केले आहेत.

Leave a Comment