ब्लॅकमेल.. अत्याचार : अल्पवयीन तरूण- तरूणीचा व्हाॅटसअप चॅटींगने केला घात

सातारा | सतरा वर्षाच्या महाविद्यालयीन मुलीला सतरा वर्षीय मुलानेच ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. मात्र, व्हाॅटसअप चॅटींग तरूणीला चांगलेच महागात पडले असून होणाऱ्या त्रासापसाून सुटका होण्यासाठी पोलिस ठाणे गाठावे लागेल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्या मैत्रिणीच्या मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाने पीडित मुलीशी ‘तिची मैत्रीण बोलतेय, असे भासवून चॅटींग केले. पीडित मुलीला वाटले तिची मैत्रीणच तिच्याशी चॅटींग करत आहे. त्यामुळे ती सुद्धा बिनधास्तपणे चॅटींग करु लागली. मात्र काही दिवसांनी आपल्याशी चॅटिंग करणारी ही मैत्रीण नसून मुलगा आहे, हे तिला समजले. त्यावेळी त्या तरुणाने पीडीत तरुणीला धमकी देऊन प्रेमाचे संबंधित मेसेज पाठवायला भाग पाडले.

मुलगा एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला एके दिवशी राजवाड्यावरील बसस्थानकात बोलावून घेतले. तिला दुचाकीवरुन शाहूपुरी परिसरातील दिव्यानगरीतील एका खोलीत नेले. या ठिकाणी त्याने ‘तुझे कॉल रेकॉर्ड तुझ्या घरच्यांना दाखवीन’ असे ब्लॅकमेल करुन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर संशयित युवकाकडून वारंवार त्रास सुरु झाल्याने मुलगी घाबरली. अखेर मुलीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात पोनि विश्वजीत घोडके यांना प्रत्यक्ष भेटून ओढवलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ संबंधित युवकावर गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

You might also like