Tata Steel कंपनीच्या प्लांटमध्ये स्फोट होऊन भीषण आग; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टिल कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीमध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीनं या घटनेची माहिती घेतली असून बचावकार्याचे आदेश दिले आहेत.

माहितीनुसार, टाटा स्टीलच्या जमशेदपूर येथील प्रकल्पात स्फोट झाल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाला. कोक प्लांटमधील बॅटरी नंबर ५, ६ आणि ७ मधील क्रॉस ओव्हरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे गॅस गळती झाली. त्यानंतर आग लागली. या घटनेत 2 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलानं आगीवर निंयत्रण मिळवलं आहे. दरम्यान, टाटा स्टीलच्या जमशेदपूरमधील यूनिटमध्ये गेल्या देखील वर्षी 18 जानेवारी 2021ला स्फोट झाल्यानं आग लागली होती. त्यामध्ये दोन कर्मचारी जखमी झाले होते.