पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात स्फोट ; दहशतवादी मसूद अजहर ठार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रावळपिंडी | पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात भीषण स्फोट झाला असून त्यात १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा अद्याप समोर आला नाही. आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झालेला आणि कर्करोगाने त्रस्त असलेला मसूद अजहर याच रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा देखील याच स्फोटात मृत्यू झाल्याचे बोलले जाते आहे.

रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात अचानक स्फोट झाला. या स्फोटात १८ रुग्ण गंभीर जखमी झाले. तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा अद्याप समोर आला नाही. अशातच मसूद अजहर या स्फोटात मारला गेल्याचे सर्वत्र बोलले जाऊ लागले आहे. मात्र यात कितपत तथ्य आहे. या बद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही. बाळकोट येथील जैश-ए-महम्मद या मसूद अजहरच्या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारताने हल्ला केला तेव्हा यात २५० दहशतवादी ठार झाले. त्यापूर्वीच पाकिस्तानी लष्कराने मसूद अजहरला रावळपिंडी या सुरक्षित स्थळी हलवले होते. आता त्याचा येथेच मृत्यू झाल्याचे बोलले जाते आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्यसूत्रधार दहशतवादी मसूद अजहर होता. हल्ला झाल्यानंतर लगेचच जैश-ए-महम्मद या त्याच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदरी स्वीकारली होती. भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानातील बाळकोट येथे हवाई हल्ला करून जैश-ए-महम्मदचे तळ उडवून दिले होते.