हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देशातील जयपूर, नागपूर, गोवा विमानतळावर बॉम्बस्फोटने (Bomb Blast Threat At Airport) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल द्वारे हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचे काम सुरु आहे.
पोलिसांनी शंका आहे कि हा एक फेक कॉल असू शकतो, कारण यापूर्वी सुद्धा अनेक विमानतळांना अशाच प्रकारचा धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता जो नंतर फेक कॉल किंवा फसवेगिरी करणारा असल्याचा कॉल निष्पन्न झाला होता. गोव्याच्या दाबोलीम विमानतळाला त्यांच्या अधिकृत ईमेलवर ईमेल प्राप्त झाला आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने शोध घेतला. “आम्ही आता अतिरिक्त खबरदारी घेत आहोत. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असताना, उड्डाण संचालनावर परिणाम होत नाही,” असे विमानतळ संचालक एसव्हीटी धनमजया राव यांनी सांगितले.
जयपूरमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी
दरम्यान, जयपूर विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सोमवारी सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कसून तपासणी करण्यात आली. विमानतळ पोलिस ठाण्याचे एसएचओ मोती लाल यांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने विमानतळ अधिकाऱ्यांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल पाठवला होता. “विमानतळाची कसून तपासणी करण्यात आली पण काहीही संशयास्पद आढळले नाही,” असे ते म्हणाले, 26 एप्रिललाही अशीच धमकी देण्यात आली होती.