‘आशीर्वाद दिखाई नही देते …परंतु असंभव को संभव बना देते हैं; संजय राऊतांचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करुन सर्वांची उत्कंठा वाढवली आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सूचक भाषा वापरली आहे. ‘आशीर्वाद दिखाई नही देते ….. परंतु असंभव को संभव बना देते हैं !!!’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि ठाकरे सरकारला नेमका कोणाचा आशीर्वाद मिळाला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 

ट्विट करण्यापूर्वी संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने घेत नाहीत. आपातकालीन परिस्थितीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना असे निर्णय घेणे अपरिहार्य असते. अशावेळी आपला वैयक्तिक दृष्टीकोन वेगळा असला तरी एक राज्य म्हणून महाविकासआघाडीतील घटकपक्ष आणि विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारशी आमचं कोणतंही वैयक्तिक भांडण नाही. केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

You might also like