चिंताजनक! मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिल आहे. कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे. त्याचा परिणाम आता मुंबईतील रक्तसाठ्यावर दिसत आहे.
ही बाब अत्यंत काळजीची आहे.

मुंबईत एकूण २७ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी 17 सरकारी तर 10 खाजगी रक्त पेढ्या आहेत. मुंबईत कोरोनाचे संक्रमण होण्यापूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरं दर महिन्याला मुंबईत आयोजित होत होती. मात्र कोरोनामध्ये हजार ते बाराशे शिबीरं झाली आहेत. या कालावधीत 50 टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी 50 टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर 15 टक्के कॉलेज व 35 टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपलब्ध व्हायचे. मात्र कोरोनामुळे 5 महिन्यात ते मिळाले नाही.

आपल्या शहराच्या अथवा जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या 1 टक्का रक्त उपलब्ध असणे आवश्यक असते. मुंबईत कोरोना पूर्वी 1 हजार रक्ताच्या बाटल्या दिवसाला लागत होत्या. कोरोनामध्ये महत्वाची ऑपरेशन न झाल्याने रक्ताची मागणी या कालावधीत कमी झाली होती. एकदा रक्तदान केले की ते रक्त 35 दिवसच चालते. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे सध्या संकलन कमी झाले होते. कोरोनामुळे शिबिरासाठी सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते पुढं न आल्याने रक्तसाठा कमी झाला आहे.

सध्या 5 ते 6 दिवस पुरेल इतका रक्तसाठा मुंबईत उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सामाजिक संस्था आणि नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी केले आहे. नवरात्रोत्सवामध्ये आरोग्य शिबिरं भरवून रक्तसाठा पुन्हा सुस्थितीत करण्याचे प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो आता रक्तदान करणे ही आपली जबाबदारी आहे. असे म्हणून पुन्हा एकदा रक्तदान शिबिराला सुरुवात करा.

2020 मधील रक्तसाठा
जानेवारी – 168144 युनिट
फेब्रुवारी – 145289 युनिट
मार्च – 110437 युनिट
एप्रिल – 53630 युनिट
मे – 91137 युनिट
जून – 99658 युनिट
जुलै – 60750 युनिट
ऑगस्ट – 62001 युनिट
सप्टेंबर – 63888 युनिट

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment