Wednesday, June 7, 2023

मलकापूरला मळाई ग्रुपच्या शिबिरात 340 जणांचे रक्तदान

कराड | श्री मळाई देवी शिक्षण संस्था, श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था व विज्ञान प्रबोधिनी कराड यांचे संयुक्त विद्यमाने आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 340 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लक्ष्मीनारायण सरलाया, प्रवीण परमार यांच्या शुभहस्ते व अशोकराव थोरात, मलकापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन अरुणादेवी पाटील, सारिका गावडे, मलकापूरच्या नगरसेविका नुरजहा मुल्ला, राजू मुल्ला,आण्णासो काशीद, भरत जंत्रे, भीमराव माऊर , प्रशांत गावडे, मुख्याध्यापक एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक अनिल शिर्के, पर्यवेक्षिका अरुणा कुंभार, मुख्याध्यापिका  सुलोचना भिसे, पवन पाटील, प्रा. शिला पाटील, संस्थेचे अध्यक्ष पी. जी. पाटील, उपाध्यक्ष बी. बी. पाटील, संचालक  वसंतराव चव्हाण, प्रा. संजय थोरात, मलकापूरचे नगरसेवक दिनेश रैनाक, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी, मान्यवर रक्तदाते ग्रामस्थ, शिक्षक बंधू भगिनी यांचे उपस्थित संपन्न झाले.

उपमुख्याध्यापक ए. एन. शिर्के यांनी आभार मानले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महालक्ष्मी ब्लड बँक कराडच्या व्यवस्थापक वीणा ढापरे, तसेच यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड प्रमुख डॉ. विवेक चव्हाण त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले. तसेच विज्ञान प्रबोधिनीचे सचिव महेश सावंत, शेखर शिर्के, प्रकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर शिबीर यशस्वितेसाठी मळाई ग्रूप सर्व सदस्य, विज्ञान प्रबोधिनी सदस्य, संस्थेच्या सर्व शाखांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, पतसंस्थेतील सर्व कर्मचारी, डॉ. दत्तात्रय बैले डॉ. कुमाजी पाटील, प्रथमेश कापूरकर मल्लिकार्जुन गोटखिंडे, वंदना पाटील, राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख पी. डी. खाडे  सर्व एन. सी. सी. कॅडेट, संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले.