नेते नाना भाऊ पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना: दि.05 जून रोजी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नेते नाना भाऊ पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योद्ध्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपाचे आयोजन कुणबी युवा जालना जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आले. कार्यकमाचे उद्घाटन जालन्याच्या आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा आमदार सुरेश जी जेथलिया होते.

यावेळी आमदार राजेश राठोड, कुणबी युवाचे अध्यक्ष तथा आयोजक ऍड राम कुऱ्हाडे, राम सावंत , भिमराव डोंगरे, राजेंद्र राख ,प्रा सत्संग मुंढे ,शहर अध्यक्ष शेख मेहमूद साहेब,बाबुराव मामा सतकर, प्रदेश सचिव सुमेध मेश्राम , संतोष दिंडे ,लक्ष्मण शिंदे श्रीरंग कामठे , विष्णू कदम , असंघटित कामगार काँग्रेस चे भागवत घाटे, आदी उपस्थित होते , सदर कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन वरून आयोजकांचे स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल आभार मानले.

यावेळी उद्घाटक आमदार गोरंट्याल यांनी कुणबी युवाच्या कार्यक्रमाचे कौतूक करत भविष्यात देखील कुणबी युवाने असेच सामाजिक उपयोगी कार्यक्रम राबऊन समाजात योग्य संदेश द्यावा असे आवाहन केले ,तर आमदार राजेश राठोड, भीमराव डोंगरे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या धडाकेबाज कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ऍड राम कुऱ्हाडे ,जयराम कदम ,सचिन कचरे ,संतोष शिंदे, अजिनाथ इंदलकर, कृष्णा चव्हाण , सिद्धू आमटे , प्रकाश गावडे कैलास खांडेकर ,परमेश्वर साबदे, ऍड शिवराम सतकर, प्रभाकर शिंदे प्रथमेश नरवडे , कै सगकर शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद ,आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले , कार्यक्रमाची प्रस्तावना राम सावंत यांनी तर सूत्र संचालन लक्ष्मण शिंदे यांनी आणि आभार प्रदर्शन ऍड राम कुऱ्हाडे यांनी केले ,

Leave a Comment