औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्ताचा रुग्णालयांमध्ये तुटवडा निर्माण होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रक्ताची कमतरता शहरातील अनेक रुग्णालयांना भासत आहे.
कोरोनाच्या संकट समयी संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला आहे. आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल 232 जणांनी रक्तदान केले.
सद्गुरु बाबा गुरुबचन सिंग यांच्या पुण्यतिथी निमित्त हे रक्तदान दरवर्षी 24 एप्रिल रोजी आयोजित केले जाते मात्र कोरोना मुळे रक्तदान 1 मे रोजी घेण्यात आले होते
या रक्तदान शिबिर मिळालेले सर्व रक्तदान शासकीय विभागीय रक्त पेठी तर्फे संकलित करण्यात आले सर्व कोरोना नियमावलीचे पालन करून रक्तदान सुरळीत पार पाडण्यात आले. रक्तदान शिबिर साठीसेवा दालन सदस्यांनी परिश्रम घेतले.