Blood Sugar Level : वयानुसार ब्लड शुगर लेव्हल किती असावी? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Blood Sugar Level – मधुमेह (Diabetes) रुग्णांसाठी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, प्रामुख्याने वयानुसार होणे महत्वाचे असते. प्रत्येक वयात रक्तातील शर्करेचे प्रमाण वेगवेगळे असते, त्यामुळे प्रत्येक वयाच्या गटासाठी शुगर लेव्हल्सची तपासणी करणे आवश्यक ठरते. मधुमेह हा एक दीर्घकालीन चयापचय रोग आहे, जो शरीरातील इन्सुलिन हार्मोनाच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढवतो. खराब आहार, वाईट जीवनशैली आणि ताणतणाव या कारणांमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन करणं आवश्यक आहे.

वयात रक्तातील शर्करेची तपासणी करणे आवश्यक –

हेल्थलाइननुसार, रक्तातील शर्करेचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढविणारे आहाराचे प्रकार आणि आहार घेण्याची पद्धत महत्त्वाची असते . उच्च रक्तातील शर्करेची लक्षणे म्हणजे धुंद दृष्टी, गोंधळ, जास्त भूक, तहान लागणे, जास्त मूत्र विसर्जन आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. मधुमेहाचे नियंत्रण न केल्यास हृदयाचे रोग, किडनी आणि फुफ्फुसांना हानी पोहोचू शकते. यामुळे, प्रत्येक वयात रक्तातील शर्करेची तपासणी करणे आवश्यक आहे.

वयानुसार रक्तातील शर्करेचे स्तर (Blood Sugar Level) –

वयानुसार रक्तातील शर्करेचे (Blood Sugar Level) योग्य स्तर वेगवेगळे असतात. 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फास्टिंग शुगर 80-180 mg/dL आणि पोस्ट मील शुगर 90-180 mg/dL असावा. 6 ते 12 वर्षे वयोगटासाठी फास्टिंग शुगर 80-150 mg/dL आणि पोस्ट मील शुगर 90-150 mg/dL असावा. 13 ते 19 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी फास्टिंग शुगर 70-150 mg/dL आणि पोस्ट मील शुगर 140 mg/dL पर्यंत असावा. 20 वर्षांवरील प्रौढांसाठी फास्टिंग शुगर 100-130 mg/dL आणि पोस्ट मील शुगर 130-140 mg/dL असावा, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी फास्टिंग शुगर 90-130 mg/dL आणि पोस्ट मील शुगर 150 mg/dL पर्यंत असावा.

ब्लड शुगर नियंत्रणासाठी उपाय –

आहारात ताजी फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
तळलेले, गोड पदार्थ आणि पॅकेज्ड फूड टाळा.
नियमित व्यायाम करा आणि तणाव टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्लड शुगरची तपासणी करा.
डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित जीवनशैली आणि आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वेळोवेळी ब्लड शुगर तपासून योग्य खबरदारी घ्या.

हे पण वाचा : HMPV व्हायरस झाल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे; पहा काय उपाय करावे