रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्याभरात विविध ठिकाणी रस्ते प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यापैकी राज्य सरकारचा सर्वात महत्त्वकांक्षी रस्ते प्रकल्प म्हणजे गोवा – नागपूर शक्तिपीठ महामार्ग. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झालं असून भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा रस्ता जिथून जाणार आहे तेथील राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांमधून या रस्त्याला विरोध करण्यात येत आहे. यामध्ये आता माझी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला आहे. पुण्यामध्ये एका बैठकी आधी बोलताना त्यांनी ‘रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही’ अशी भूमिका घेतली आहे.

गोवा नागपूर महामार्ग बाबत अनेक शेतकऱ्यांमधून विरोध होताना दिसतो आहे त्यामध्ये आता राजू शेट्टींची सुद्धा भर पडली असून पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या संबंधी आयोजित केलेल्या बैठकीच्या आधी बोलताना त्याने रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शक्ती पिठाला स्थगिती देण्याच्या घोषणा झाल्या एकूण खर्च डीपीआर काय ? हे समजून घेण्यासाठी पत्र दिले होते त्याचे उत्तर त्यांनी दिले होते. त्यात ते म्हणाले 86000 कोटी खर्च येणार आहे. पत्रात म्हटलं की समृद्धी प्रमाणे मोबदला देण्याचा प्रस्तावित आहे पण स्पष्टता नाही. केवळ प्रस्तावित आहे असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. रक्ताचे पाठ वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

MSRDC ने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या अलाइनमेंटनुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता 760Km ऐवजी 805Km किमी लांबीचा असणार आहे. या मार्गाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीला 21 तासांचा प्रवास हा साधारणतः निव्वळ अकरा तासांवर येणार आहे.

दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे.