IND vs Ban Test 2024 : अश्विनचा बांगलादेशला चोप !! संकटात सापडलेल्या टीम इंडियाला तारलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs Ban Test 2024) संकटात सापडलेल्या टीम इंडियाला आर अश्विनने (R Ashwin) चांगलंच तारलं. एकवेळ भारताची अवस्था १४४-६ अशी असताना टीम इंडिया २०० धावांचा टप्पा तरी पार करते का असा प्रश्न पडला होता. मात्र आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडगोळीने टीम दमदार भागीदारी करत टीम इंडियाला फक्त संकटातूनच बाहेर काढलं नाही तर संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली आहे. यामध्ये अश्र्विन तर खूपच आक्रमक मोडमध्ये पाहायला मिळाला.

चेन्नईवरील आजच्या सामन्यात (IND vs Ban Test 2024) बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल हे तिन्ही आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी संघाचा डाव सावरला. परंतु लंच ब्रेक नंतर लगेचच पंत ३९ धावांवर बाद झाला, त्यापाठोपाठ यशस्वी जैस्वाल सुद्धा ५६ धावांवर आऊट झाल्याने टीम इंडिया पुन्हा एकदा संकटात आली. भारताची धावसंख्या एकवेळ १४४-६ अशी होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा ऑल आऊट पडतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र इथूनच सुरु झाला अश्विन आणि जडेजा यांचा खेळ…. क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या या दोन्ही फलंदाजांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत संघाला संकटातून बाहेर काढलं.

अश्विन ९० चेंडूत ८१ धावांवर खेळत आहे– (IND vs Ban Test 2024)

एकीकडे जडेजा शांततेत खेळत आहे, तर दुसरीकडे अण्णा अश्विन थेट गोलंदाजावर आक्रमण करत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलत आहे. सध्या अश्विन ९० चेंडूत ८१ धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकार ठोकला आहे तर दुसरीकडे रवींद्र जडेजा सुद्धा ८८चेंडूत ६५ धावांवर खेळत आहे, त्यानेही ८ चौकार आणि १ षटकार मारला आहे. आतापर्यंत ७२ ओव्हर चा सामना झाला असून भारताची धावसंख्या २९७-६ अशी आहे. जडेजा आणि अश्विन ज्याप्रकारे खेळ खेळत आहेत आणि एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवत आहेत ते पाहता बांगलादेश साठी पुनरागमन करणं नक्कीच अवघड झालं आहे. अश्र्विन आणि जडेजाची जोडी आणखी वेळ मैदानावर राहावी अशीच भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल.