तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार; कराड शहरात वातावरण तणावपुर्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शहरातील कृष्णा नाका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हातगाड्यावर चिक्कीचा व्यवसाय करणार्‍या युवकावर एकाने घातक शस्त्राने वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याचे समजत आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी यूवकावर कृष्णा रूग्णालयात उपचार सूरू आहेत. मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुंधवार पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, असे उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पांढरीच्या मारूती मंदीर परिसरात साडेसात वाजण्याच्या सुमारास हातगाड्यावर चिक्की विकणार्‍या बुधवार पेठेतील यूवकावर अज्ञातांनी घातक शस्त्रांने वार केला. यूवकाच्या मानेवर हा वर्मी घाव बसल्याने यूवक भितीने ज्योतिबा मंदीर,कन्याशाळा रोडने पळत सूटला. मिलिंद शिंदे हा युवक अंगावरती रक्त सांडलेल्या अवस्थेत व कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्याने पळत सुटला. हा काय प्रकार आहे म्हणून लोकांनी गर्दी केली असता त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समजली. यामध्ये त्याच्या मानेवर जबर जखम झाल्याने त्याला कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले आहे.

दरम्यान, सबंधित व्यवसायिक यूवकावर प्रेम प्रकरणातून कार्वे कोरेगाव येथिल यूवकांने हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मात्र शिंदेवर हल्ला कोणी केला? त्यामागचे कारण काय होते? याची ओळख अद्याप पटलेली नव्हती. पांढरीच्या मारूती चौकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हल्ला करणारे कोण होते? याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होते.

You might also like