हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फसवणूक करणाऱ्या वेबसाईटला आळा घालण्यासाठी गूगल एका नव्या फीचरवर काम करत. या फीचरची सध्या चाचणी सुरू असून, आता वेबसाईट्सवर ब्लू चेकमार्क दिसणार आहे. त्यामुळे युजर्सना खरी आणि खोटी वेबसाईट्स कोणत्या आहेत, याची तुलना सहजपणे करता येणार आहे. त्यामुळे खोट्या वेबसाईट्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. जेव्हा तुम्ही गुगलवर काही सर्च करता, तेव्हा अनेक वेबसाईट दिसतात. त्यावर अजून कोणतेही ब्लू चेकमार्क नाही. पण लवकरच वेबसाईट डोमेन नावाच्या आधी ब्लू टिक दिसणार आहे. या चेकमार्कमुळे वेबसाईट खरी आहे याची खात्री होईल. या फिचर्सच्या वापरामुळे सुरक्षितता वाढली जाणार आहे.
विश्वसनीय माहिती मिळणार
गुगलने सुरुवातीला मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या वेबसाइट्सना ब्लू टिक मार्क देण्यास सुरुवात केली आहे. यासोबत एखाद्यी माहिती सुरक्षित आहे की, नाही हे मॅसेजवर सांगितले जाईल. युजर्सना ब्लू चेक मार्क पाहून समजेल की, त्यांनी जे सर्च केले आहे, त्यात कोणती वेबसाइट खोटी आणि विश्वसनीय हे समजण्यास फायदेशीर ठरेल. ज्या वेबसाईटवरून लोकांना फसवले जाते ते नाहीसे होणार आहे. सध्या ब्लू चेक मार्कसंबंधी अधिक माहिती आलेली नाही. पण गुगलचे हे फिचर्स इंस्टाग्राम, फेसबुक किंवा एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवरील ब्लू टिक प्रमाणे असणार आहे. या फीचर्समुळे योग्य माहिती मिळवण्यास मदत होणार आहे.
कोणाला मिळणार ब्लू टिक
गूगलचे हे नवीन फिचर अजून यूजर्ससाठी उपलब्ध झालेले नाही . एका रिपोर्टनुसार ते सर्वप्रथम मोठ्या कंपनीना वापरण्यासाठी दिले जाईल अशी शक्यता आहे. त्यानंतर इतर यूजर्ससाठी उपलब्ध होईल.