मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवली; राज्य सरकारचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ इतकी होणार आहे. फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत सध्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीआधारे निश्चित केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहिली. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे.

दरम्यान,पुढील वर्षी म्हणजेच 2022 मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना एकत्रित लढणार आहेत. तर, कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे

Leave a Comment