करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कठोर पावले उचलली आहेत. मुंबईतील रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता १००० रुपये दंड आकारला जाईल. त्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर आता मार्शल तैनात करण्यात येतील.

एकीकडं करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर थुंकल्यास दंड आकाराला जाणार आहे तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट सुद्धा महाग झालं आहे. आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी ५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईतील करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment