BMC Recruitment 2023 | आजकाल महानगरपालिकेचे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आणि शिक्षकांची संख्या कमी पडत आहे. मागील अनेक वर्षापासून शिक्षकांची भरती झालेली नाहीये. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी होईल यासाठी शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी तब्बल 1342 भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
ही खूप मोठी भरती असून त्यासाठी जाहिरात देखील प्रकाशित केली जाणार आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलगू, कन्नड, गुजराती अशा एकूण आठ भाषांच्या माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे 119 शाळा आहेत. या शाळांमध्ये मिळून तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. कोरोणा महामारीनंतर पालिका शाळांमधील पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षण विभागाने खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी वस्तू देखील वाटप केलेले आहे.
शाळांमधील पटसंख्या तर वाढली परंतु शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. आणि त्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने चार माध्यमांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पात्र असणाऱ्या उमेदवारांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याची छाननी केल्यानंतर यादी जाहीर होईल. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत तुमच्या कागदपत्रांची देखील पडताळणी केली.
हेही वाचा – Cameron Airpark : ऐकलं का? ‘या’ शहरात प्रत्येकाकडे आहे खासगी विमान; घराघरांत केलंय हँगरचं बांधकाम
रिक्त पदे |BMC Recruitment 2023
- इंग्रजी – 698
- हिंदी – 239
- मराठी – 216
- उर्दू – 198