BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी; महिना मिळणार 75 हजार रुपये पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BMC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही एक संधी घेऊन आलेला आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2024) काम करायचे आहेत. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुंबई महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ञ, मनोसोपचारतज्ञ, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

सल्लागार

या भरती अंतर्गत सल्लागार या पदाच्या 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण एमबीबीएस एमडी पूर्ण असणे गरजेचे आहे. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 73500 रुपये एवढा पगार दिला जाईल.

बालरोगतज्ञ

बालरोग तज्ञ या पदाच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस एमडी बालरोग ही पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढा पगार दिला जाईल.

मानसोपचार तज्ञ

मानसोपचार तज्ञ या पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस एमडी पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढा पगार दिला जाईल.

शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक

या पदाच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. त्याचप्रमाणे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस किंवा कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी असणे गरजेचे आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस डिग्री असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीतील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 दरम्यान असणे गरजेचे आहे.

मुलाखतीचा पत्ता

सह कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यू.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रूम नं. 13 डॉ बाबासाहेब रोड परेल या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. 23 जुलै रोजी या मुलाखती पार पडणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा