व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | BMW मोटरराड इंडिया (BMW G310 RR) कंपनीने आज आपली G 310 RR ही बाईक लाँच केली आहे. स्पोर्ट्स कॅटेगरीची ही High Rate बाईक तिच्या फीचर्स आणि किमतीच्या रेंजमुळे बाजारात चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे. BMW G 310 RR हि बाईक नुकतीच लाँच झालेल्या TVS ronin आणि TVS Apache ला थेट टक्कर देईल. चला जाणून घेऊया या दमदार बाईक बाबत सर्वकाही …

डिझाइन आणि वैशिष्ट्ये- (BMW G310 RR)

2022 BMW G310 RR च्या डिझाईनबद्दल (BMW G310 RR) बोलायचे झाले तर बाईकचा लुक TVS Apache RR 310 सारखाच हे . या अत्याधुनिक बाइकमध्ये ट्विन प्रोजेक्टर लाइट्स हेडलॅम्प, एरोडायनामिक डिझाइन देण्यात आले आहे. तसेच, यात LED टेललॅम्पही मिळतील. तसेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह 5.0-इंच कलर टीएफटी डिस्प्ले मिळेल.

BMW G310 RR

 इंजिन आणि गिअरबॉक्स-

2022 BMW G310 RR च्या इंजिन आणि गिअरबॉक्सबद्दल (BMW G310 RR) बोलायचे झाले तर यात 313 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. यात लिक्विड कूल्ड फ्युएल इंजेक्शन इंजिन सुद्धा आहे. तसेच, हे इंजिन 6500 rpm वर 33.5 bhp चा पॉवर जनरेट करू शकते. तर 7500 rpm वर 28 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह येते.

झिरो डाउन पेमेंट सुविधा-

BMW Motorrad ने ही स्पोर्ट्स बाईक लॉन्च करण्यापूर्वीच ग्राहकांसाठी प्रीबुकिंगचा पर्याय खुला केला होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहक शून्य डाउन पेमेंटसह दरमहा 3,999 रुपये EMI भरून BMW G 310 RR बाइक खरेदी करू शकतात.

BMW G310 RR

बाइकची किंमत काय असेल-

BMW G 310 RR बाईकची एक्स-शोरूम किंमत अंदाजे २.६५ ते २.९९ लाख रुपये असू शकते.

हे पण वाचा:

Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट

TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार