पुणे | लहान मुलांसाठी तयार करण्यात येणार्या रूग्णालयाच्या आराखड्यासाठी अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत महर्षी स्त्री संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील तीन विद्यार्थिनींना तिसरा पुरस्कार मिळाला.
सोनाली इंदलकर,वृंदा पानसे आणि ऐश्वर्या शेंडगे असी या विद्यार्थिनींचे नावे असून त्या बीएनसीएच्या पर्यावरण वास्तूरचना अभ्यासक्रमातील दुसर्या वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या 110 गटांपैकी पहिल्या पाचमध्ये बीएनसीएच्या दोन गटांना स्थान मिळाले. त्यापैकी एका गटाला विशेष उल्लेखनीय म्हणून गौरवण्यात आले.
हॉसमॅक या संस्थेतर्फे ऑल इंडिया हेल्थकेअर आर्किटेक्चरल स्टुडंट्स डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मुलांसाठी रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्याचा विषय देण्यात आला होता. यात तिसरा पुरस्कार मिळालेल्या बीएनसीएच्या तिघींच्या गटाला 15 हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. विजयी स्पर्धकांना बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप तसेच प्रा.सुजाता कर्वे,प्रा. सोनाली राजवाडे, प्रा.प्राजक्ता कुलकर्णी, प्रा. नम्रता धामणकर, प्रा.निधी दीक्षित आणि प्रा. राहूल नवले यांचे मार्गदर्शन लाभले.