Board Exam : फेस स्कॅनिंग नंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश, बोर्डाचा निर्णय

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Board Exam : यंदाच्या वर्षीची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा मंडळाने चंग बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यावर्षी केंद्रावरील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना फेस स्कॅनिंग करूनच केंद्रात प्रवेश (Board Exam) दिला जाणार आहे.

… तर गुन्हा दाखल करण्यात येणार (Board Exam)

कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केले आहे परीक्षेमध्ये गैरप्रकार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र व असामीनपात्र कोणीही दाखल (Board Exam) करण्यात येणार आहेत तसेच गैरमरगाची प्रकरण आढळून येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.

संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण (Board Exam)

परीक्षेच्या वेळी केंद्राबाहेर चित्रीकरण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरारी पथक व बैठक पथक नेमण्यात येणार आहेत तसेच केंद्राच्या पाचशे मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की 2018 पासूनच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत तसेच आदेश (Board Exam) संबंधितांना देण्यात आले आहेत संवेदनशील केंद्रांचे ड्रोनमार्फत चित्रीकरण करण्यात येणार आहे.